Welcome to Deepstambh
Mail Us deepstambh27@gmail.com
logo
Call Us 0257 - 2242299

सुयोग अमृत नगरदेवळेकर
माझे वडील सामाजिक कार्यात तर आई प्राथमिक शिक्षिका आहे. बीएस्सी पर्यंत भडगावच्या महाविद्यालयात शिक्षण घेतले. एमबीए ची पदवी मिळवल्यानंतर काही काळ नोकरी करून स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली. 2008 मध्ये STI पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो त्यानंतर बँक प्रोबेशनरी ऑफिसर , उपजिल्हाधिकारी या पदांसाठी निवड झाली.



मनोज महाजन
अडावद येथे प्राथमिक शिक्षण तर पाचोरा येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर जळगावला 11 वी मध्ये प्रवेश घेतला तेव्हा पासूनच दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रात यजुर्वेद महाजन सरांचे वैयक्तिक समुपदेशन मार्गदर्शन घेत होतो. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर सातत्यपूर्ण अभ्यास करून 2018 मध्ये यूपीएससीच्या परीक्षेत 125 Rank ने उत्तीर्ण होऊन IAS झालो.


गणेश पाटील (SP Excise)
तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात चौथा क्रमांक मिळवून राज्य उत्पादन शुल्क विभागात अधीक्षक पद मिळवले.




स्नेहा सराफ
मी मूळची यावलची, वडील शेतकरी आणि आई प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत होती. भुसावळ येथे बी. एस्सी. केल्यानंतर दीपस्तंभ मध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. माझी पहिल्या प्रयत्नात PSI पदी निवड , राज्यसेवा पहिल्या प्रयत्नात सहायक निबंधक या पदावर निवड व 2010 मध्ये उपअधीक्षक ( राज्य उत्पादन शुल्क) या पदावर निवड झाली.


प्रविण चव्हाण (IRS)
स्पर्धा परीक्षां आणि व्यक्तिमत्व विकास यांचा सुरेख संगम म्हणजे दीपस्तंभ. मी या केंद्राचा विद्याथी, अध्यापक आणि वरिष्ठ मार्गदर्शक अश्या सर्व भूमिकांमध्ये वावरतो. उत्तम मार्गदर्शन, उत्तम कौन्सेलिंग आणि उत्तम सराव याचा सुरेख समन्वय येथे दिसतो.




विजयानंद शर्मा (उपजिल्हाधिकारी)
MPSC च्या मुलाखतीची सर्वींत्तम तयारी करून घेणारे केंद्र म्हणजे दीपस्तंभ. नामवंत अधिकारी व तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे माझी येथे उत्तम तयारी झाली.

नामदेव पाटील (तहसीलदार)
खानदेश स्पर्धा परीक्षा क्षेत्रात खूप मागे होता .मी 2003 पासून यूपीएससीची तयारी करत होतो. तेव्हा साधे स्पर्धा परीक्षांचे मासिक सुद्धा जळगावात मिळत नव्हते.तशात संघर्ष करून मी यूपीएससी परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलो,मात्र यश आले नाही. नंतर 2005 मध्ये यजुर्वेंद्र महाजन सर यांनी जळगावात दिपस्तंभ ही चळवळ सुरू केली. मी त्या चळवळीतला मार्गदर्शक या चळवळीने खानदेशाचे शैक्षणिक रूप पालटले.ज्या भागात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची वानवा होती त्या भागातून आज हजारो मुलं विविध प्रशासकीय पदांवर कार्यरत आहेत. ही दिपस्तंभ ने घडविलेली क्रांती आहे. या चळवळीचा एक घटक असल्याचा मला नेहमी आनंद वाटतो.

शिरीष देशमुख (लेफ्टनंट भारतीय भूसेना, अंमळनेर)
मी आठवीत असताना अमळनेर येथे सानेगुरुजी शाळेत यजुर्वेंद्र महाजन सरांचे व्याख्यान ऐकले .त्या व्याख्यानातून प्रेरणा घेऊन एनडीए द्वारा सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगले.दहावी मध्ये असताना दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या मार्गदर्शनात एसपीआय परीक्षेची तयारी केली.उन्हाळ्याच्या सुट्टीत महिनाभर दीपस्तंभला राहिलो आणि यश मिळाले .औरंगाबाद येथे एस पी आय मधून शिक्षण घेऊन एनडीए प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालो. आज लेफ्टनंट पदावर भारतीय सैन्यदलात सेवा देत आहे .मी माझा पहिला पगार दीपस्तंभच्या सामाजिक कार्यासाठी देणगी स्वरूपात देत आहे. दीपस्तंभ यासारख्या सामाजिक जबाबदारीचे भान असणाऱ्या संस्थांमुळे वंचित गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना भविष्यासाठी उत्तम मार्गदर्शन मिळत आहे. या परिवाराचा सदस्य असल्याचा मला अभिमान आहे .

भारती पाटील
जळगाव जिल्ह्यातील ता. एरंडोल हे माझं सासर. लग्नानंतर कुटुंब लहान मुलगा यांची जबाबदारी सांभाळून जळगाव ते एरंडोल असा प्रवास करीत दीपस्तंभ मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन घेत होती. एकाच वेळी या सर्व जबाबदारी सांभाळून अभ्यास करावा लागत होता. दहा वर्ष सतत प्रयत्न करून एकाच वर्षी 4 वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मला यश आले.STI या पदी रुजू झाली.

गणेश बुवा (सहाय्यक पोलीस निरीक्षक, जळगाव)
मी धुळे जिल्ह्यातील भडणे या गावातला सामान्य विद्यार्थी होतो ,आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती.आई वडील शेती करायचे ,मी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि नंतर सुरत येथे एका कंपनीत कामाला लागलो.या कंपनीत काम करताना मला एका व्यक्तीने सल्ला दिला, "एवढे १२वी पर्यंत शिकला आहेस तर पुढे चांगले शिक्षण घेऊन सरकारी नोकरी कर" .त्यात मला दीपस्तंभ येथील गुरुकुल योजनेबद्दल माहिती मिळाली श्री कपिल पवार सर यांनी यजुर्वेंद्र महाजन सरांशी संपर्क करून मला जळगाव येथे पाठवले. दीपस्तंभ येथे कमवा व शिका योजनेत मला प्रवेश मिळाला. मी खरंतर पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी दिपस्तंभला आलो ,मात्र येथील प्रेरणादायी वातावरण ,तज्ञ मार्गदर्शक ,चांगल्या नोट्स व यजुर्वेंद्र महाजन सरांची प्रेरणा यामुळे आज सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहे .माझ्यासारख्या शेकडो ग्रामीण भागातील तरुणांचे जीवन घडविणाऱ्या दीपस्तंभ मला सलाम .!

राजश्री पाटील (PSI)
मी लग्नानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. परिवारावच्या जबाबदाऱ्या सांभाळुन मी अभ्यास करत होते. यजुर्वेंद्र महाजन सरांच्या कौन्सेलिंगने मला आत्मविश्वास दिला. आज मी PSI आणि TAX Asst या दोन पदांवर यशस्वी आहे.

प्रसाद गोरे
मी मूळचा बारामतीचा. दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रात नॅशनल इन्स्टिट्यूट लीडरशिप डेव्हलपमेंट NILD कोर्ससाठी मी तीन वर्ष प्रशिक्षण घेतले होते व यूपीएससी साठी तयारी करीत होतो. CAPF( UPSC) या परीक्षेतून असिस्टंट कमांडंट या पदासाठी वयाच्या 22 वर्षी पहिल्याच प्रयत्नात माझी निवड झाली.

शीतल पाटील
माझे वडील निवृत्त पोलीस उपनिरीक्षक असल्यामुळे मला लहानपणापासूनच अधिकारी होण्याची इच्छा होती इंग्रजी विषययातून एम ए पदवी घेतल्यानंतर 2007 मध्ये मी दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रात मार्गदर्शन घेण्यासाठी सुरुवात केली. पीएसआय मुख्य परीक्षा पास केल्यानंतर शारीरिक चाचणीत यश आले नाही तरी पुन्हा जोमाने प्रयत्न करून पीएसआय पदासाठी पात्र झाली.

विकास पाटील
भडगाव या तालुक्याच्या गावी पदवी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. MA नंतर शिक्षकाची नोकरी करत असताना रविवार वर्गात दीपस्तंभ मध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. 2011 मध्ये एमपीएससी ची परीक्षा उत्तीर्ण झालो आणि उपशिक्षणाधिकारी या पदावर रुजू झालो.

तेजस देशमुख
मी मूळचा वरणगाव ता. भुसावळ येथील आहे. अहमदनगर येथे मेकॅनिकल इंजिनिअर शिक्षण पूर्ण केल्यानंतर 2016 दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात AMVI बॅच ला प्रवेश घेतला.2017 मध्ये मोटार वाहन उपनिरीक्षक या पदासाठी निवड झाली.




भक्ती काळे
मी मूळची ता. इंदापूर, पुणे येथील आहे. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग चे शिक्षण पूर्ण केल्यावर दीपस्तंभ जळगाव येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घेतला. 2017 मध्ये STI , PSI Excise , वनसंरक्षक अधीक्षक (Rank First) ,तहसीलदार या पदासाठी माझी निवड झाली व मी तहसीलदार म्हणून रुजू झाली.



माया राजपूत
तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे डीएड पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. माझे आई-वडील व्यवसायाने शेती करतात. 2014 सली दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रात गुरूकुल या प्रकल्पांतर्गत प्रवेश घेतला. योग्य मार्गदर्शन व नियमित अभ्यास यामुळे माझी 2018 मध्ये पीएसआय पदी निवड झाली.




धनंजय मंगरुळकर
अडावद ता.चोपडा येथे माध्यमिक शिक्षण, तर पदवीचे शिक्षण जळगांव येथे पूर्ण केले.माझे वडील माध्यमिक शिक्षक होते व आई गृहिणी होती. २००५ मध्ये पदवी पूर्ण केल्यानंतर दीपस्तंभ मध्ये स्पर्धा परीक्षा तयारीला सुरुवात केली. २००८ मध्ये प्रथम सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ लिपिक म्हणून निवड, त्यानंतर जलसंपदा विभागात भांडारपाल पदी व नंतर २००९ मध्ये STI पदी निवड झाली.