• व्यवसाय नव्हे सेवा आणि पिढी घडवणे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्यातील क्षमता , गुण- कौशल्य, आवड याचे परीक्षण करून मार्गदर्शन करण्यात येते .विद्यार्थी व पालक यांचे योग्य समुपदेशन करून स्पर्धा परीक्षांसह इतर क्षेत्रातील करिअरबाबत विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो.ज्या विद्यार्थ्यांमध्ये अधिकारी होऊन कष्ट करण्याची तयारी असते, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याची क्षमता असते, पण मनात स्पर्धा परीक्षांची भीती असते, अश्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून ,त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक ते सर्व मार्गदर्शन केले जाते.
• दीपस्तंभ मध्ये महाराष्ट्रातील 28-30 वेगवेगळ्या जिल्हातून विद्यार्थी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण घेण्यासाठी येतात. स्पर्धा परीक्षांचे सुप्रसिद्ध लेखक श्री. किरण देसले ( अर्थशास्त्र),श्री दीपक बाविस्कर ( भूगोल), श्री.जयदीप पाटील (सामान्य विज्ञान), श्री.खेमचंद्र पाटील( गणित व बुद्धिमत्ता), श्री.लीलाधर पाटील ( मराठी व्याकरण) व डॉ हर्षल कुलकर्णी यांच्यासारख्या दहा वर्षे स्पर्धा परीक्षा क्षेत्रात शिकवण्याचा अनुभव असलेले मार्गदर्शक ,शिक्षक येथे नवनवीन तंत्रज्ञान व अद्ययावत माहिती च्या आधारे विद्यार्थ्यांना शिकवतात.
• दीपस्तंभ ही अत्यंत प्रामाणिकपणे विद्यार्थांच्या हितावह काम करणारी संस्था आहे .येथे प्रत्येक विद्यार्थ्याची वैयक्तिक कौन्सलींग केली जाते. तसेच संस्थेचे संस्थापक यजूर्वेंद्र महाजन यांचे नियमित मार्गदर्शन विद्यार्थांना मिळते.
वेगवेगळ्या क्षेत्रातील जेष्ठ मार्गदर्शक , प्रशासकीय सेवेतील अनुभवी अधिकारी यांच्याशी विद्यार्थ्यांना संवाद साधता येतो.
•सुरक्षित व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले अभ्यास पूरक वातावरण, मोठ्या शहरांच्या तुलनेने कमी शुल्कात भोजन व निवास व्यवस्था व गुणवत्ता पूर्ण मार्गदर्शन येथे उपलब्ध करण्यात आलेले आहे.
• दीपस्तंभ परिवारात सर्व विद्यार्थ्यांची कुटुंबातील सदस्या प्रमाणे काळजी घेतली जाते. अधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेत असलेले तसेच विविध क्षेत्रात यशस्वी कार्यरत असलेले सर्व आजी माजी विद्यार्थी दीपस्तंभशी जुळलेले आहेत व त्यांचा दीपस्तंभ च्या वेगवेगळ्या कार्यात सहभाग असतो.