दीपस्तंभ फाउंडेशन

दीपस्तंभ शिष्यवृत्ती महाभियान २०१६ दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेतून मुलाखती साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी     |     भोपाळ सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी     |     पुणे सहलीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी     |     वेटिंग लिस्ट (जर कोणी विद्यार्थी कॅन्सल झाल्यास)     |     एक दिवसीय वर्कशॉप साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी     |     दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान उत्तर पत्रिका २०१६     |     दीपस्तंभ आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान २०१६ - यादी क्रमांक २ (पुस्तके भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी )     |     दीपस्तंभ आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान २०१६ - यादी क्रमांक ३ (पुस्तक भेटीसाठी निवड झालेले विद्यार्थी)     |     प्रत्येक शाळेची सविस्तर मार्क लिस्ट शाळांना पाठवली जाईल. मुलाखतीची दिनांक विद्यार्थ्यांना फोन करून कळविले जाईल. निकाल पुढील निकषांवर आधारित आहेत - जिल्हा , शहरी, गट १, गट २ , त्यामुळे कट ऑफ मेरिट वेग वेगळे असू शकते.     |    

दीपस्तंभ स्पर्धा परिक्षा महाभियान-२०१५ आता ऑनलाईन पद्धतीने

समाजाचे आपण काही देणं लागतो...इतरांसाठी काहीतरी केल पाहिजे...खेडयाकडे परत गेलं पाहिजे...शिक्षण हाच समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे...एखाद्या देशातील तरुणांची संख्या व त्यांची गुणवत्ता हेच त्या देशाचे उज्ज्वल भविष्याचे द्योतक असते...अशा अनेक विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी 'दीपस्तंभ' नावाची सेवाभावी संस्था २००५ मध्ये सुरु करण्यात आली.

महाराष्ट्रात विशेषतः खानदेशात स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, मुल्यशिक्षण, पालक प्रबोधन, शिक्षक प्रबोधन, वाचन संस्कार, तळागाळातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ह्या कार्यातून ही संस्था २ लाख लोकांपर्यंत पोहोचली...रुजली...

शेकडो कार्यकर्ते असलेली हि संस्था आजच्या जगात ख-या अर्थाने दृढपणे उभी राहून शिक्षण क्षेत्राला व तरुणाईला प्रकाश व दिशा देण्याचे कार्य करीत आहे. सामाजिक जबाबदारीचे भान असलेले व गुणवत्तेची जान असलेले नागरिक एकत्र करून संपूर्ण देशात...सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात गुणवत्ता पूर्ण कार्य उभारण्याच स्वप्न आहे.

खूप अंधार पसरलेला असेल तर प्रकाशाची अनेक किरणं एकत्र आणणं हाच त्यावर पर्याय असतो. तसेच अनेक वाईट प्रवृत्ती व घटना मोठ्या प्रमाणात समोर असतील तर सर्व चांगल्या व्यक्तींना एकत्र येवून रचनात्मक कार्य करावे लागेल. त्यासाठी चला एकत्र येवूया. हे जग अधिक सुंदर बनवूया....!