वाचन संस्कार व प्रबोधन संस्था

'जगण' समजून घेण्यासाठी व विकसित होण्यासाठी पुस्तक वाचण्याशिवाय दुसरा सहजसाध्य आणि प्रभावी मार्ग नाही. समृद्ध होण्यासाठी, आपल्याला हव्या त्या वाटेचा शोध घेण्यासाठी मुलांनी, पालकांनी, शिक्षकांनी, उद्योजकांनी, कामगारांनी, सगळ्यांनी खूप वाचावं व पुस्तकांच्या विश्वात प्रवेश करण्यासाठी हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला.

स्वरूप

• पुस्तक प्रबोधन व मार्गदर्शन - नेमकी कोणती पुस्तके वाचावीत हे समजण्यासाठी उत्कृष्ट अशा १०० पुस्तकांचा अंतर्भाव असलेल्या १०,००० माहिती पत्रकांचे विनामूल्य वितरण मान्यवर लेखकांचे विविध कार्यक्रमांद्वारे मार्गदर्शन.
• ग्रंथालय - जे विद्यार्थी स्वतः पुस्तके विकत घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी अत्यल्प दराने ग्रंथालयाची सुविधा.
• पुस्तक विक्री व प्रदर्शन - विविध शैक्षणिक कार्यक्रमाचे ठिकाणी सवलतीत पुस्तकांची विक्री व प्रदर्शन.
• वाचक मेळावा, सेमिनार व चर्चासत्रे - जागतिक पुस्तक दिनानिमित्त श्री अच्युत गोडबोले यांच्याशी प्रत्यक्ष वार्तालाप व वेळोवेळी वाचलेल्या पुस्तकांवर चर्चासत्राचे आयोजन.
• पुस्तक लेखन व निर्मिती - अभ्यास मित्र , करिअर मित्र , स्पर्धा परीक्षा मराठी व्याकरण , स्पर्धा परीक्षा, अर्थशास्त्र या महाराष्ट्रात गाजणारे पुस्तकांचे लेखन व निर्मिती.

उपक्रमाचे उद्देश

• उत्तम पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचावीत - वाचकांना नेमके काय वाचावे हे माहितीअभावी लक्षात येत नाही. मराठी व इंग्रजीत उत्कृष्ट पुस्तकांची चोखंदळ व मान्यवर वाचकांच्या मार्गदर्शनाखाली निवड करून ती पुस्तके सवलतीच्या दरात वाचकांना घरपोच उपलब्ध करून देणे.
• घरपोच पुस्तकांची योजना - कमवा व शिका योजनेअंतर्गत संस्थेत शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येते व त्यातील नफा त्यांच्या जेवण व राहण्यासाठी दिला जातो.
• या दोन्ही सत्कार्यात समन्वय साधण्याचे समाधान आम्हास मिळावे.

उपक्रम

• आत्मविश्वास व प्रेरणा अभियान
• पुस्तकभेट योजना
• गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप

आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान २०१० - ११ (शालेय विद्यार्थ्यांसाठी)

अभियानाचा उद्देश -
विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कार रुजविणे व सुसंस्कृत, सुजाण व्यक्तिमत्व घडविणे.
अभियानाचे स्वरूप :
'ताई मी कलेक्टर व्हयनू' व धडपडणार्‍या तरुणाईसाठी' या दोन पुस्तकांचे वाचन इ. ८ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थ्यांनी मुल्यशिक्षणाच्या / समाजकार्याच्या तासिकेला केले. या पुस्तकांवर आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी व लेखी स्वरुपाची परीक्षा २ जाने. २०११ रोजी घेण्यात आली व या परीक्षेत प्रथम येणार्‍या पहिल्या ५० विद्यार्थ्यांना दिल्ली येथे तर पुढच्या ५० विद्यार्थ्यांना मुंबई येथे सहलीला नेण्यात आले होते.
व्याप्ती - संपूर्ण जळगाव जिल्हा
कालावधी - १ महिना २६ दिवस
विद्यार्थी सहभाग - ५२००० विद्यार्थी
शिक्षक सहभाग - ३००० शिक्षकांनी अभियानाच्या विविध कामामध्ये सहभाग दिला तर ४०० तज्ञ शिक्षकांनी सलग ३ दिवस पेपर तपासणीसाठी सहभाग दिला.
शाळा सहभाग - जिल्ह्यातील ६०० मराठी, सेमी इंग्रजी, इंग्रजी व उर्दू माध्यमातील शाळांचा सहभाग.
तालुका समन्वयक - १५ (प्रत्येक तालुक्यासाठी एक)
परीक्षा कार्यकर्ते - ६०० (प्रत्येक शाळेसाठी एक)
अभियानात प्रत्यक्ष सहभागी समाजातील घटक - विद्यार्थी, शिक्षक, इंजिनिअर्स, कंत्राटदार, शासकीय अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, व्यायसायिक, डॉक्टर्स, राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते, संस्थाचालक, शिक्षण विभाग व मुख्याध्यापक, शिक्षक संघटना, खाजगी क्लासेस.
अभियानाची उपलब्धी -
• विद्यार्थ्यांसाठी
१. आकलनावर आधारित परीक्षेमुळे स्पर्धा परीक्षांचा अंदाज
२. अवांतर वाचनाची आवड, सवय व गरजही लक्षात आलि.
३. भव्य स्वप्न बघायची प्रबळ इच्छा जागृति.
४. स्वप्न साकार करण्यासाठी लागणारा आत्मविश्वास.
५. काही तरी भव्य - दिव्य करून दाखवायची प्रेरणा
६. दुर्दम्य 'इच्छाशक्ती'
७. कष्ट करण्याची 'जिद्द'
८. सामाजिक भान
९. मोठे व्हिजन मिळाल्याने दुष्टीकोनात बदल.
१० . स्पर्धा परीक्षांची मुलभूत माहिती मिललि.
सामान्य परिस्थितील, ग्रामीण भागातील मराठी माध्यमातील मुलगा परिस्थितीची अनुकुलता नसूनही जर हे करु शकतो तर मग मी का नाही? हा आत्मशोध घ्यायला लावणारा प्रश्नच या मुलांचे भविष्य घडविणार आहे.
• शिक्षकांसाठी
१. एका पिढी घडविणाऱ्या अभियानात सहभागाचे 'समाधान'
२. मुल अवांतरही आवडीने वाचतात हा नवीन 'प्रत्यय'
३. अवांतर वाचनातून मुलांची झालेली वेंचारिक 'प्रगती'
• आमच्यासाठी
१. दुर्दम्य आत्मविश्वास
२. आत्यंतिक समाधान
३. नियोजन व सर्व समावेशकत्वाचे मोल.
समाजातील सर्व घटक एका प्रामाणिक, उदात्त हेतूने एकत्रित आलेत तर कुठल्याही अनुदानाविना, शासकीय यंत्रणे विना संपूर्ण पिढी घडविण्याचे काम अतिशय यशस्वीपणे करू शकतात याचे हे देश पातळी वरील उत्कूष्ट उदाहरणच आहे.

आत्मविश्वास व प्रेरणा अभियान २०११-१२ (खानदेशातील शिक्षक व प्राध्यापकांसाठी)

व्याप्ती - जळ्गाव, धुळे व नंदुरबार जिल्हा (एकूण २५ तालुके)
कालावधी - १०० दिवस
व्याख्याने - १३७ (शिक्षक प्रबोधनासाठी)
प्रवास - १६००० कि.मी. (अभियानातील शिक्षक प्रबोधनासाठी संपूर्ण खानदेशात)
शिक्षक संवाद - २७००० शिक्षक व प्राध्यापकांशी प्रत्यक्ष संवाद
माहिती पत्रके - ६०००० माहिती पत्रके सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवलीत
सहभाग - ७००० शिक्षक व प्राध्यापक
पुस्तके - ५१००० पुस्तके सवलतीत शिक्षकांपर्यंत पोहोचवलीत
अभियानाची उपलब्धी -
१. अत्यंत अभ्यासू, निष्ठावीन, कार्यक्रम अशा ५०० शिक्षकांचा मोठा गट प्रथमच एका व्यासपीठावर आला.
२. खूप काही करू इच्छीनाऱ्या, धडपडणाऱ्या शिक्षकांना एक हक्काचे व्यासपीठ प्राप्त शले. आपापल्या व्यक्तिगत स्तरावर अत्यंत निष्ठेने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना आता चर्चा, विचाराचे देवाण-घेवान करणेसाठी व उपक्रम शीलता वाढविण्याची संधी उपलब्ध झाली.
३. वाचनामुळे स्वत:मध्ये झालेले बदल लक्षात घेऊन वाचनाची अधिकच आवड निर्माण झाली.
४. विद्यार्थ्यांप्रती, आपल्या पवित्र पेशाप्रती, एक शिक्षक म्हणून स्वत:प्रती बघण्याची नवी दुष्टी मिळून सामाजिक परिस्थितीमुळे काळाच्या ओघात आलेली नेसर्गिक मरगळ दूर होणेसाठी मदत झाली.
५. शिक्षकांचा आत्मसन्मान जागृत झाला व त्याचे परिवर्तन त्यांच्या कामाप्रती अधिक समर्पण देण्यासाठी होईल.
६. काही नवीन, धडपडनाऱ्या शिक्षकांना काम करताना अडचणी आल्यात तर मार्ग काढण्यासाठीही व्यासपीठ मिळाले.

विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी अवांतर वाचण्याची पुस्तके
पालकांसाठी उपयुक्त पुस्तके