दीपस्तंभ फाउंडेशन

दीपस्तंभ यशोत्सव निमंत्रण २०१८    |     दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियान २०१८ - विद्यार्थ्यांसाठीच्या सूचना    |     दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियान २०१८ परीक्षेचा फायनल निकाल    |     दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान २०१८ मुलाखतीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी    |     दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान २०१८ निकाल    |     दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाभियान २०१८ विद्यार्थी सूचनापत्रक    |     दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियान २०१८ उत्तरतालिका    |     दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती महाअभियान    |     National Institute of Leadership Development Entrance Exam 2018    |     दीपस्तंभ आत्मविश्वास व वाचन प्रेरणा अभियान २०१७    |     निकाल - ट्रिप , कार्यशाळा व पुस्तक भेट    |     तालुकानिहाय निकाल    |     आडनावानुसार निकाल

समाजाचे आपण काही देणं लागतो...इतरांसाठी काहीतरी केल पाहिजे...खेडयाकडे परत गेलं पाहिजे...शिक्षण हाच समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे...एखाद्या देशातील तरुणांची संख्या व त्यांची गुणवत्ता हेच त्या देशाचे उज्ज्वल भविष्याचे द्योतक असते...अशा अनेक विचारांना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी 'दीपस्तंभ' नावाची सेवाभावी संस्था २००५ मध्ये सुरु करण्यात आली.

महाराष्ट्रात विशेषतः खानदेशात स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास, मुल्यशिक्षण, पालक प्रबोधन, शिक्षक प्रबोधन, वाचन संस्कार, तळागाळातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती ह्या कार्यातून ही संस्था २ लाख लोकांपर्यंत पोहोचली...रुजली...

शेकडो कार्यकर्ते असलेली हि संस्था आजच्या जगात ख-या अर्थाने दृढपणे उभी राहून शिक्षण क्षेत्राला व तरुणाईला प्रकाश व दिशा देण्याचे कार्य करीत आहे. सामाजिक जबाबदारीचे भान असलेले व गुणवत्तेची जान असलेले नागरिक एकत्र करून संपूर्ण देशात...सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात गुणवत्ता पूर्ण कार्य उभारण्याच स्वप्न आहे.

खूप अंधार पसरलेला असेल तर प्रकाशाची अनेक किरणं एकत्र आणणं हाच त्यावर पर्याय असतो. तसेच अनेक वाईट प्रवृत्ती व घटना मोठ्या प्रमाणात समोर असतील तर सर्व चांगल्या व्यक्तींना एकत्र येवून रचनात्मक कार्य करावे लागेल. त्यासाठी चला एकत्र येवूया. हे जग अधिक सुंदर बनवूया....!