स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - उद्दिष्टे

• ग्रामीण भागातील तरुणांमधील स्पर्धा परीक्षाबाबतचा न्युनगंड, मरगळ नष्ट होऊन आत्मविश्वास व उत्साह संचारावा.
• स्पर्धा परीक्षाद्वारे प्रशासकीय अधिकारी होऊन उत्तुंग भरारी घेण्यासाठी त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे.
• UPSC / MPSC स्पर्धा परीक्षांसाठी गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची यंत्रणा उभारून त्या माध्यमातून फक्त श्रीमंतच नव्हे तर आर्थिक दुर्बल, गरीब होतकरू विद्यार्थ्यांनाही संधी उपलब्ध करून देणे.
• यातून सकारात्मक, कर्तव्यदक्ष व प्रामाणिक युवा पिढी घडविणे.

वैशिष्ट्ये

खान्देशातील पहिले गुणवत्तापूर्ण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र - या अंतर्गत UPSC, MPSC या परीक्षांसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीसाठी मार्गदर्शन व प्रशिक्षण.
• MBA -CAT, GRE -TOFEL, MBA-CET, MBA-CMAT या प्रवेश परीक्षांच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनासाठी ELC, Nasik या संस्थेचे सहकार्य.
• सर्व प्रकारच्या नवीन बॅचेस १ जून पासून सुरु व जाहिरातीनुसार त्या त्या वेळी इतर बॅचेस.
• जळगाव जिल्ह्यासोबतच धुळे, नंदुरबार, सोलापूर, नाशिक, बुलढाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, गडचिरोली, नागपूर, सातारा, सांगली, ठाणे, अकोला, अमरावती, रत्नागिरी, यवतमाळ अशा जवळ जवळ सोळा जिल्ह्यांमधून विद्यार्थी मार्गदर्शनासाठी येतात.
• दरवर्षी २२०० विध्यार्थ्यांना प्रशिक्षण, ७ वर्षात २०,००० विध्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतले.
• आजपावेतो ४५० हून अधिक विद्यार्थ्यांची वर्ग - १ व वर्ग - २ प्रशासकीय अधिकारी पदी निवड तर १००० हून अधिक विद्यार्थ्यांची वर्ग - ३ पदी निवड.
• पुणे, मुंबई, औरंगाबाद येथील १०० हून अधिक तज्ञ अतिथी मार्गदर्शक, ५० हून अधिक स्थानिक मार्गदर्शक.
• खानदेशातील पहिले करीयर कौन्सलिंग व मुलाखत प्रशिक्षण केंद्र.
• प्रेरणादायी मुलाखत व व्याख्याने.
• गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी 'कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजना' आजपावेतो १३००+ विद्यार्थ्यांना, भोजन, अभ्यास साहित्य इ. साठी अर्थसहाय्य.
• ४०००+ पुस्तकांचे सुसज्ज ग्रंथालय.
• अभ्यास, कौन्सलिंग, व्यक्तिमत्व विकास शिबिरे.
• सर्व सुविधायुक्त अभ्यासिका
• पोस्टल कोर्स, नियमित व रविवार बॅचेस.

कोर्सेस

८ वी ते १२ वी साठी Mission UPSC/MPSC मार्गदर्शन कार्यशाळा - स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी व व्यक्तिमत्व विकासासंबंधी मार्गदर्शन.
१० वी साठी ( SPI / NDA ) - NDA ला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍यांसाठी SPI प्रवेश परीक्षेची तयारी.
प्रथम वर्ष ते तृतीय वर्ष पदवी - सर्व स्पर्धा परीक्षांसाठी व व्यक्तिमत्व विकसनासाठी फाउंडेशन कोर्स - रोज २ तास / रविवार बॅच. MPSC, UPSC, Banking, NDA, CDS या सर्व स्पर्धा परीक्षांच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट करण्याबरोबरच पदवी प्राप्त करीत असतांनाच उत्तुंग यशाचा पाया पक्का करा.
पदवीधरांसाठी -

UPSC MBA - CMAT / CAT
MPSC MCA - CET
PSI / STI / Asst. Bank Clerical / Bank PO
Railway / LIC D.O. पोलीस भरती
B.Ed. - CET तलाठी / ग्रामसेवक / लिपिक
D.Ed. - CET शिक्षणविस्तार अधिकारी

गणित व इंग्रजी विषयांचे बेसिक कोर्स.
मुलाखत मार्गदर्शन केंद्र - सर्व प्रकारच्या मुलाखातींसाठी तज्ञ व्यक्तींद्वारे संपूर्ण सराव. Audio-Video पद्धतीने मार्गदर्शन.
शाखा - धुळे, अमळनेर, नंदुरबार, चाळीसगाव, बारामती, आनंदवन, नागपूर, घारेवाडी
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके
दीपस्तंभ - स्थानिक व अतिथी मार्गदर्शक