व्यकिमत्व विकास

मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासठी
१) ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी "मिशन सक्सेस" हा उपक्रम
२) पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्षास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स
३) महावियालये व संस्थांमध्ये "व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा"

करिअर समुपदेशन
• करिअर म्हणजे काय? • अभ्यास होत नाही,काय करू?
• करिअरचे महत्व काय? • मला चांगले गुण मिळाले नाही तर?
• करिअर कसे ठरवावे? • मी नापास झालो तर?
• आपण करिअर निवडताना काय विचार करतो? • काही विषयांची भीती वाटते?
• करिअरबाबत स्वतःला व इतरांना काय विचारावे? • अभ्यास झालेला असतो पण परीक्षेत लक्षात राहत नाही?
• स्वतःला कसे ओळखावे? • मन एकाग्र होत नाही,काय करू?
• करिअर कसे घडवावे? • अभ्यास करावासा वाटतो पण घरात वातावरण नाही?
• करिअरबाबत पालक व शिक्षकाची भूमिका काय असावी?

ह्या आणि अशा सा-या प्रश्नावर आपल्याला उत्तर!!! - करिअर समुपदेशन!

आपण कुठे चुकतो?

• आपल्याकडे करिअर ठरविणे ही बाब फार गांभीर्याने घेत नाहीत व जे करिअर ठरविले जाते ते संपूर्णतः सुरक्षितता, सामाजिक प्रतिष्ठा, पैसा या मानकांनुसार ठरविले जाते.
• परिणामी मुला-मुलींच्या आवडी, क्षमता, कौशल्ये यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्या करिअर विकासात मर्यादा येतात. यातून अनेकजण निराश, अपयशी होतात....आत्महत्याही करतात.
• विद्यार्थ्यांच्या क्षमता व कौशल्यांना वाव न मिळाल्यामुळे त्यांच्याकडून गुणवत्तापूर्ण प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे त्या क्षेत्राची व परिणामी देशाची प्रगती होत नाही.
याबाबत विद्यार्थ्यांना विचार करण्यास व त्या विचारांना योग्य दिशा देण्यासाठी श्री. यजुर्वेंद्र महाजन स्वतः करिअर समुपदेशक (CAREER COUNSELOR) म्हणून काम करतात.

समुपदेशन का?

• करिअर समुपदेशन - विद्यार्थ्यांच्या क्षमता जाणून त्याला करिअरच्या विविध वाटांची माहिती करून देणे व योग्य करिअर निवडी साठी मार्गदर्शन करणे.
• अभ्यासेतर विद्यार्थ्यांच्या समस्यांवर मार्गदर्शन.
• विद्यार्थी-पालक कौटुंबिक समस्यांवर मार्गदर्शन.

समुपदेशन कसे?

• भेटीची वेळ घेणे
• नियोजित वेळेवर कार्यालयात येऊन फॉर्म भरणे
• फी : रु. ४०० /- (टीप: आर्थिक परिस्थिती हलाखीची असणा-या विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शन मोफत आहे)
ह्या योजनेद्वारा मिळणारी संपूर्ण रक्कम आमच्या कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजने साठी वापरली जाते.

करिअर समुपदेशक

• प्रा. यजुर्वेंद्र महाजन
• प्रा. सविता भोळे
• श्री. जयदीप पाटील